holi, ballons, nashik police, Rang Panchami 2023 saam tv
महाराष्ट्र

Rang Panchami 2023 : रंगपंचमीत फुगे मारणा-यांवर राहणार पाेलिसांचा वाॅच, पालकांसाठी विशेष सूचना

उत्सव साजरा केल्या जाणा-या मंडळांची बैठक संपन्न.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- तबरेज शेख

Nashik : रंग पंचिमीला (Rang Panchami 2023) फुगे (ballons) फेकून एखाद्याला इजा (injured) झाल्यास संबंधितांना पोलिस कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर लहान मुलांनी देखील कोणाला फुगे मारल्याने इजा झाल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल असे नाशिक पोलिस (nashik police) उपआयुक्त किरणकुमार चौहान यांनी नमूद केले. (Maharashtra News)

मंडळाची बैठक संपन्न

अवघ्या काही दिवसांवर रंगपंचमीचा सण येऊन ठेपला आहे. नाशिक शहरात मोठ्या उत्साहात हा सणसाजरा केला जातो. शेकडो वर्षांची रहाड परंपरा देखील या दिवशी साजरी केली जाते. अनेक पेशवे कालीन रहाड या आजही नाशिकच्या जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात आहे. अनेक मंडळांकडून देखील या दिवशी रंगपंचमी उत्सव आयोजित करण्यात येत असतात. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात रंगपंचमी उत्सव मंडळांसोबत बैठकीचे आयाेजन करण्यात आले होते.

फुगे मारले जातात

या दरम्यान पोलीस अधिकारी यांनी या मंडळांना विविध सूचना केल्या. तसेच रंगपंचमी हा सण साजरा करत असताना अनेक जणांकडून फुग्यांमध्ये पाणी भरून एकमेकांवर फेकून देखील रंगपंचमी साजरी केली जाते. परंतु हे पाण्याचे फुगे खेळत असताना एखाद्याला यामुळे इजा देखील होऊ शकते.

पाेलिसांची असणार करडी नजर

त्यामुळे जर कोणी असे केल्याने एखाद्याला दुखापत झाल्यास संबंधीत फुगे मारून फेकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत. अनेक लहान मूल देखील अश्याच प्रकारे पायी जाणाऱ्यांवर किंवा गाडीवरून जात असलेल्यांवर फुगे मारून फेकत असतात. अश्यातच जर एखाद्याला इजा झाल्यास त्या मुलांच्या पालकांवर पाेलिस कारवाई करतील. त्यामुळे रंगपंचमी खेळताना नियमांचे पालन करावे असे आवाहन किरणकुमार चौहान यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT