Political Criminals Under Police Radar Saam
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Political Criminals Under Police Radar: नाशिक शहरातील राजकीय गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नुकतेच भाजपमध्ये गेलेले मामा राजवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Bhagyashree Kamble

  • नाशिकमध्ये पोलीस ऑन अॅक्शन मोड

  • राजकीय गुंडांच्या आवळल्या मुसक्या.

  • मामा राजवाडेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

नाशिकमध्ये सध्या पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. शहरातील राजकीय गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठं पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी राजकीय गुंड अर्थात काही नेत्यांसह समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करणारे मामा राजवाडे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याआधीच या घडामोड घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशकात काही राजकीय गुंडांनी हैदोस माजवला आहे. या गुंडांमुळे सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली असल्याचं पाहायला मिळालं. विसे मळा गोळीबारप्रकरणी नुकतेच भाजपमध्ये गेलेले मामा राजवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तर, सातपूर गोळीबारप्रकरणी RPIचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रकाश लोंढे आणि त्यांचे चिरंजीव या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेत दोघांनाही पोलिसांनी कोठडीत ठेवलंय.

तसेच शिंदे सेनेतील पवन पवार यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. पवन पवार फरार असून, सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. अन्य राजकीय गुंडांच्या देखील मुसक्या आवळण्यास पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक पार पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री आणि महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि इतर काही मंत्री देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत जिल्हानिहाय होणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीत भाजप एकला चलोची भूमिका घेणार की महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी

पुणे पोलिसांचा दणका! निलेश घायवळनंतर सख्खा भाऊ सचिनवरही मकोका, VIDEO

Maharashtra Politics : सोलापूरात भाजपची ताकद वाढली, पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

Anarsa Recipe : दिवाळीला घरीच बनवा मऊसूत-जाळीदार अनारसे, परफेक्ट रेसिपी जाणून घ्या

दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा, आमदारांचं वक्तव्य, VIDEO

SCROLL FOR NEXT