नाशिक : कोरोना काळात रुग्णास अनामत मिळवून देण्यासाठी रुग्णालयात गांधीगीरी स्टाइलने अर्धनग्न आंदोलन करत नफे खोरीकडे लक्ष वेधणारे आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांनी अनेकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं होतं. मात्र, याच भावेंना फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम व अन्य सोशल मीडियावरून नाशिक (Nashik) पोलिसांबद्दल बदनामीकारक लिखाण करणं महागात पडलं आहे. सदर जितेंद्र भावेंच्या विरोधात पोलिस बॉईज मित्र मंडळाच्या वतीने पोलिस आयुक्ताकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ( nashik Police Boys Mitra Mandal complaint against jitendra bhave over Facebook post )
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस बॉईज मित्र मंडळाचे अक्षय गांगुर्डे यांनी लेखी तक्रार नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या लेखी तक्रारीत जितेंद्र भावे यांच्या विरोधात ४ मे रोजी फेसबुक(Facebook) आणि ट्विटरवरून नाशिक शहर पोलिसांबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिला गेल्याची तक्रार आहे. भावेंच्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'माऊली लॉन्स आणि खुटवड नगर येथे अर्धा डझन वाहतूक पोलीस थांबतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांकडून पाचशे रुपये घेतात. पोलीस रक्षक की भक्षक, अशा आशयाचा मजकूर जितेंद्र भावे यांनी लिहिला. या आशयावरून पोलीस बॉइस मित्र मंडळाने सदर बदनामीकारक मजकूरामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे भावेंविरोधात कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे अर्जामार्फत करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रार अर्जावर आप नेते जितेंद्र भावे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भावे म्हणाले की, 'मी जे विधान केले आहे त्यावर ठाम असून सरकारी यंत्रणा चुकत असेल तर त्यांना जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही त्यावर प्रश्र विचारणार, अशा शब्दात जितेंद्र भावे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुढे जितेंद्र भावे म्हणाले, 'जिथे वाहतुकीची समस्या आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस न थांबता एकाच ठिकाणी ७ ते ८ पोलीस थांबून लोकांवर दबाव टाकत कारवाई करतात. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांकडून नाशिकरांची लूट थांबत नाही, तोपर्यंत आम्ही आवाज उठवणार, असंही भावे यांनी सांगितलं.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.