nashik, nashik crime news
nashik, nashik crime news saam tv
महाराष्ट्र

Nashik : गाड्या चाेरी करणारी टाेळी अटकेत, १४ दुचाकींसह फॉर्च्यूनर हस्तगत

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : नाशिक (nashik) शहरातील वाढत्या गुन्हेगारी तसेच चाे-या राेखण्यासाठी नाशिक पाेलिसांनी निर्धार केला आहे. या दाेन दिवसांत नाशिक पाेलिसांनी (police) एक दुचाकी चाेरी करणारी टाेळी तसेच चार चाकी चाेरीच्या घटनेत एकास अटक (arrest) केली आहे. पाेलिसांच्या या धडक कारवाईमुळं गुन्हेगारांवर वचक बसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. (nashik latest marathi news)

नाशिक रोड पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी फॉर्च्यूनर गाडी चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. याप्रकरणी पांडुरंग एखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडी चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीवरून पोलीस गाडीचा तपास करत असताना फॉर्च्यूनर गाडी धुळे मार्गे केल्याची गुप्त बातमी पोलिसानं मिळाली.

वाय-फाय, लॅपटॉपच्या साह्याने गाडी चाेरी

त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मध्यप्रदेश (madhyapradesh) ,राजस्थान या ठिकाणी गाडी संदर्भात चौकशी केली. त्यानंतर ही गाडी राजस्थान मधील चितोडगड येथील भांडारिया पुलाजवळ पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान आढळून आली. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेथे जाऊन एका संशयीतासह गाडी ताब्यात घेऊन नाशिक येथे घेऊन आले. संशयित आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने वाय-फाय आणि लॅपटॉपच्या साह्याने गाडी चालू करून चोरी केल्याची माहिती दिली. तसेच या चोरीत आणखी दोघांचा समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

१४ दुचाकी हस्तगत

नाशिक शहरात एकीकडे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना दुचाकी चोरणारे चोरटे देखील सुसाट होते. शहरात दुचाकी चोरत धुमाकूळ घालणाऱ्या याच टोळीला चोरीच्या तब्बल १४ मोटार सायकलसह पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना कमालीच्या वाढल्या होत्या. त्यामुळे शहरात दुचाकी धारकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आणि पोलिसांपुढे उभे राहिलं ते या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान हाेतं. त्यामुळे पोलीस प्रशासन या दुचाकी चोरांच्या मागावर होते. दुचाकी चोरीचे हे गुन्हे उघडकीस आणण्याचे सक्त निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले हाेते.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने प्रयत्न सुरू केले. दरम्यान चोरटे जळगाव (jalgoan) जिल्ह्यात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केलं आहे. अमोल पाटील, विशाल पाटील, दिनेश पाटील, मल्हारी पाटील अशी पकडलेल्या संशयतांची नावं आहेत.

nashik

विशेष म्हणजे हे संशयित आरोपी उच्चशिक्षित असून ते फक्त हौस म्हणून मोटार सायकल चोरायचे. केवळ मौजमजेसाठी सातपूरच्या मोठ्या-मोठ्या कंपन्यांच्या पार्किंगमधील मोटार सायकल चोरून त्या अमळनेर (जिल्हा जळगाव) या ठिकाणी विकत असल्याची माहिती जयंत नाईकनवरे (पोलीस आयुक्त, नाशिक) यांनी दिली. दरम्यान दुचाकींचे हॅन्डलॉक तोडून दुचाकी चोरणाऱ्या या टोळीचे पोलिसांनी बेड्या ठोकून हँड लाॅक केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Ghatkopar Hoarding Collapse Case: मोठी अपडेट! उदयपूरमधून भावेश भिडेला अटक

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून केली अटक

Malegaon News: क्षुल्लक भांडणावरून ८ वर्षांच्या चिमुकलीची हत्या, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

OTT Released This Week : ‘द नक्सल स्टोरी’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, OTT वर मनोरंजनचा धमाका; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT