Farmers Andolan Saam Tv
महाराष्ट्र

Farmers Andolan: शेतकऱ्यांचे आमदारांना फोन करो आंदाेलन, जाणून घ्या कारण

अतिवृष्टीमुळे झालेल्या कांदा नुकसानीचे जाहीर झालेलं अनुदान अद्याप मिळालेलं नसल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आमदारांना फोन करो आंदोलन

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik Onion Farmer: कांद्याच अनुदान मिळावे, यासाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता फोन करो आंदोलन हाती घेतलंय. कांदा अनुदान मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपआपल्या तालुक्यातील आमदारांना फोन करो आंदोलन करावं, असं आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं केलंय. (Latest Marathi News)

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई अनुदान आणि चार महिन्यांपूर्वी जाहीर झालेले कांदा अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यावर वर्ग झालेले नाही. कालपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील आमदारांना फोन करावेत असं आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं केलंय. (Nashik News)

यासोबतच तत्काळ सरसकट सर्व अर्ज जमा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची मागणी संबंधित आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी फोनवर करावी.

जोपर्यंत याबाबत अधिवेशनात ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदारांना फोन करत राहावेत, असं आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT