Nashik sexual harassment of students AI Photo (Saam TV News)
महाराष्ट्र

Nursing College Scandal : नाशिक हादरलं! छातीवर, पाठीवर हात फिरवला अन्...प्राचार्याने ४ मुलींचा केला विनयभंग

Nashik sexual harassment of students : नाशिकमध्ये नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्य प्रवीण घोलप यांनी ४ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघड. पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल, पोलिसांकडून सखोल तपास.

Namdeo Kumbhar

Nashik molestation case : गुरू-शिष्याच्या नात्याला पवित्र समजले जाते. मात्र, याच नात्याला नाशिकमध्ये काळिमा फासणारी घटना घडली आहे. नाशिकमधील नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याने चार विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. प्रवीण घोलप असे आरोपी प्राचार्याचे नाव आहे. नाशिकमधील नामांकित कॉलेजच्या प्राचार्य विरोधात भद्राकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील ४ विद्यार्थिनीने विनयभंगाचा गंभीर आरोप केला. या प्रकणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण रमेश घोलप असे संशयित प्राचार्याचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राचार्याला अटक केली आहे. नाशिक पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

नाशिकमध्ये एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी ५ ऑगस्ट २०२४ पासून २९ मे २०२५ पर्यंत द्वारका सर्कल येथील एका कॉलेज ऑफ नर्सिंग येथे शिक्षण घेत होती. या काळात प्राचार्य प्रवीण घोलप यांनी वारंवार पीडितेस त्रास देत शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्या खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर हात फिरवला. तसेच हात हातात घेऊन अश्लील स्पर्श केला. त्याने पीडितेची साडी ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील नजरेने पाहून तिचा विनयभंग केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ही धक्कादायक घटना घडली त्या वेळेस पीडिता अतिशय घाबरलेली होती. तिच्या अन्य मैत्रीण बरोबरही असाच प्रकार घडला असल्याची माहिती तिला समजली. त्यानंतर पीडित मुलीने हिम्मत करत भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करून संशयित प्रवीण रमेश घोलप (वय ४०) याला अटक केली. गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung 5G Phone: सॅमसंगचा मोठा धमाका! Galaxy A07 5Gमध्ये दमदार कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Vakri 2026: 30 वर्षांनंतर शनी चालणार वक्री चाल; या राशींना मिळणार लाभाची संधी

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Virat Kohli: इंस्टावर कोहलीचं कमबॅक! का डिएक्टिव झालेलं विराटचं अकाऊंट? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT