Born Child Change Nashik Hospital News:  Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: अजब-गजब प्रकरण! जन्माला आला मुलगा पण हातात दिली मुलगी; नाशिक जिल्हा रुग्णालयात काय घडलं?

अभिजीत सोनावणे

Nashik Hospital News: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र डिस्चार्ज करताना रुग्णालयाने त्यांच्या हातात मुलगी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत बाळ घेण्यास नकार दिला ज्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एक महिला प्रसुतीसाठी गेली होती. या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज देताना त्यांना मुलगी झाल्याचे सांगण्यात आले आणि बाळही हातात दिले. या प्रकाराने नातेवाईकही अवाक झाले. जिल्हा रुग्णालयाच्या रजिस्टरवर देखील मुलगा झाल्याची नोंद होती मात्र रुग्णालयाने त्यांना मुलगी झाल्याचे सांगताच नातेवाईक अवाक झाले.

रुग्णालय प्रशासनाच्या या कारभारानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरापर्यंत चांगलाच गोंधळ घातला. तसेच अपत्य ताब्यात घेण्यासही नकार दिला. यावेळी पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालय प्रशासनास जाब विचारला. याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि नातेवाईक यांच्यात चर्चा सुरूच असून जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिलेत. या प्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange - OBC : हिंमत असेल तर 288...; ओबीसी बांधवांचे मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज

Insurance: क्या बात, क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या

Nanded Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; नाना पटोले यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Updates: बदलापुरात महानगर गॅसची मुख्य पाईपलाईन फुटली

New Justice Statue In SC: आता न्यायदेवता डोळस होणार! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT