Malegaon Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Water Shortage : मालेगावमध्ये पाणी कपात; शनिवारपासून तीन दिवसांआड पाणी पुरवठा

Nashik News : नाशिकच्या मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चणकापुर व गिरणा धरण क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिक जिल्ह्यात यंदा हवा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. यामुळे शेतातील पिके वाचविण्यासोबत पाणी टंचाईचे संकट उभे आहे. याच दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मालेगावमध्ये पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला असून आता २७ जुलैपासून तीन दिवसांआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.

राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असताना (Nashik) नाशिक जिल्ह्यात यंदा हवा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. यात नाशिकच्या मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चणकापुर व गिरणा धरण क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. पाऊस न झाल्याने या धरणांमधील आरक्षित पाणी साठा देखील संपुष्टात आला असून ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक असल्याने (Malegaon) मालेगाव वर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे.

आगामी काळात दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची तीव्रता अधिक तीव्र होण्याची भीती आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने आता मालेगाव शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात (Water Scarcity) शनिवारपासून तीन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मालेगाव महापालिकेच्या इतिहासातील पहिल्यांदाच पाणी कपात करण्यात आली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची आवाहन आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

SCROLL FOR NEXT