Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Assembly Election 2024 : दुसऱ्याच उमेदवाराला जातेय मत; इगतपुरीच्या तळेगाव येथे गोंधळ, मतदान प्रक्रिया थांबविली

Nashik News : नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथील मतदान केंद्रावर मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान न जाता दुसऱ्या उमेदवाराला जात असल्याचा आरोप

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथे गोंधळ उडाला आहे. यात मतदान केल्यानंतर मशीनवरील बटन दाबले असता ते दुसऱ्याच उमेदवाराला मतदान जात असल्याचा प्रकार होत आहे. यामुळे या केंद्रावरील मतदान प्रक्रिया काही वेळ थांबविण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) राज्यात आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरवात झाली असून राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. मात्र (Nashik News) नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथील मतदान केंद्रावर मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान न जाता दुसऱ्या उमेदवाराला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथे गोंधळ उडाला आहे. 

दरम्यान नागरिकांच्या तक्रारीनंतर इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील तळेगाव येथे घडलेली घटना चर्चेत आली आहे. दुसऱ्या उमेदवाराला मतदान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीमुळे काही काळ मतदान थांबविण्यात आले आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन मतदान केंद्रावर दाखल झाले असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT