Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : गावात पाण्याची समस्या; नागरिकांचे पाण्यासाठी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

Nashik News : राज्यात बहुतांश ठिकाणी यंदा चांगला पाऊस झाला होता. यामुळे पाणी टंचाईची समस्या जाणविणार नसल्याची शक्यता होती. मार्च महिना सुरू होताच अनेक भागात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
येवला (नाशिक)
: राज्यातील अनेक भागात फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची समस्या जनविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील कुसमाडी देखील पाणी टंचाईने ग्रामस्थ बेजार झाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी आज गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. 

मार्च महिना सुरू होताच राज्यातील अनेक भागात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी यंदा चांगला पाऊस झाला होता. यामुळे पाणी टंचाईची समस्या जाणविणार नसल्याची शक्यता होती. तरी देखील पाणी टंचाई जाणवत आहे. तर नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. याचा परिणाम दिसत असून नाशिकच्या येवला तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. 

पाच दिवसांआड येते गावात पाणी 

येवला तालुक्यातील कुसमाडी येथे पाच दिवसानंतर गावात पाणी पुरवठा होता असतो. यामुळे येणारे पाणी देखील पुरत नाही. त्यात काही ग्रामस्थांच्या पाणीपट्टीची रक्कम थकल्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वच गावाचा पाणी पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकी वरती चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. 

पाणीपट्टी थकविणाऱ्यांमुळे गावाला त्रास 
ग्रामपंचायतकडे पाणी पट्टी भरणे आवश्यक असताना गावातील अनेकांनी पाणी पट्टीची रक्कम भरलेली नाही. अर्थात काही लोकांनी थकविलेल्या पाणी पट्टीमुळे संपूर्ण गावाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टाकीवर चढत आंदोलन केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

SCROLL FOR NEXT