Igatpuri News Saam tv
महाराष्ट्र

Igatpuri News : वृद्धेला खांद्यावर उचलुन नदीतून काढली वाट; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी जीवघेणी कसरत

Nashik News : दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती असते. तरी देखील प्रशासनाकडून या ठिकाणी पक्का रस्ता तयार करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असते. परिणामी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

इगतपुरी (नाशिक) : अनेक भागात आजही पक्के रस्ते झालेले नाहीत. यामुळे येथील नागरिकांना पायपीट करत जावे लागत असते. अशात पावसामुळे नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यातून वृद्ध महिलेला रुग्णालयात उपचाराला नेण्यासाठी खांद्यावर उचलून वाट काढावी लागल्याचे धक्कादायक वास्तव इगतपुरी तालुक्यात पाहण्यास मिळाले. +

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी या आदिवासी भागातील पार्वताबाई खतेले (वय ७०) हि वृद्ध महिला आजारी होती. यामुळे या वृद्धेला उपचारासाठी खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली. वाटेत असलेल्या कडवा नदीला पूर असल्याने नदी पार करून दोन व्यक्तींनी वृद्धेला खांद्यावर उचलून उपचारासाठी तीन किमीची पायपीट करत रुग्णालयात नेले. विशेष म्हणजे नदीला असलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. 

रस्ता नसल्याने परिस्थिती उद्वभवली 

रस्ता नसल्याने गुडघाभर पाण्यातून खांद्यावर उचलून नेण्यात आले. तर याच महिलेच्या उपचारासाठी तीन दिवस अगोदर एका डॉक्टराला नदी पार करून नेण्यात आलं होतं. मात्र महिलेच्या प्रकृतीची फरक न पडल्याने तिला खांद्यावर उचलून खाजगी रुग्णालयात नेण्याची वेळ आली. तर दोन गर्भवती महिलांना या समस्येमुळे प्रसूतीसाठी दुसऱ्या गावातील नातेवाईकांकडे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दर वर्षी पावसाळ्यात या भागात हीच परिस्थिती असते. 

पुरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका 

गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. रामकुंड परिसरात पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण येथे अडकला होता. पुराच्या पाण्यात अडकलेल्या या नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकलेल्या व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT