Washim : फवारणी करताना रानडुकराचा हल्ला; जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Washim News : रानडुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना साधारण २० दिवसांपूर्वी घडली होती. मागील काही दिवसांपासून उपचार सुरु असताना अखेर तरुणाची झुंज अपयशी ठरली असून त्याचा मृत्यू झाला
Washim News
Washim NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: शेतामध्ये पिकांवर फवारणीचे काम करत असताना रानडुकराने अचानक हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव शिवारात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथील सोहेल खान असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी सोहेल खान आणि त्याचा भाऊ सलमान खान हे दोघेजण सारसी येथील शेतामध्ये सोयाबीन पिकावर फवारणीच्या कामासाठी गेले होते. फवारणीचे काम आटोपून दोघे भरून घरी येण्यासाठी निघाले होते. मात्र परत येत असताना रस्त्यातच रानडुकरांनी अचानक दोन्ही भावांवर हल्ला केला. 

Washim News
Teacher ID Scam: बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, ६८० शिक्षकांना अटक होणार?

मृत्यूची झुंज अपयशी 

रानडुकराने केलेल्या हल्ल्यात सोहेल खान हा गंभीर जखमी झाला होता. तर त्याचा भाऊ सलमान याला किरकोळ दुखापत झाली होती. दोघांनी आरडाओरड केल्याने रानडुकरानी तेथून पळ काढला. मात्र गंभीर जखमी असलेल्या सोहेल खान याला प्रथम वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Washim News
Crime News : परदेशात नोकरीच्या खोट्या प्रलोभनाचा पर्दाफाश; मनसेच्या हस्तक्षेपाने दोन तरुणांची सुटका


कुटुंबीयांचा आक्रोश 
घरची परिस्थिती हलाकीची असल्याने दोघे भाऊ मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होते. मात्र गरीब कुटुंबातील या तरुणाच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयानी एकच आक्रोश केला. तर आसेगाव गावात शोककळा पसरली. तर राजडुकराच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com