Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; १०० पोपटांचा मृत्यू, काही पोपट जखमी

Nashik News : हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मागील दोन- तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : राज्यात बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. या दरम्यान रात्रीच्या सुमारास (Nashik) नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अवकाळी पाऊस (Rain) झाला. वादळी तडाख्यामुळे झाडावर बसलेल्या पोपटांचा मृत्यू झाला आहे.

हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मागील दोन- तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान पुढील दोन दिवस अजून पाऊस सांगण्यात आला आहे. याच दरम्यान नाशिक जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार वारा व पाऊस झाला. 

रात्री झालेल्या वादळी वारा, अवकाळी पावसाचा फटका पशू पक्षांना बसला असून (Nandgaon) नांदगावच्या पोखरी गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या हलक्या स्वरूपाच्या गारपीट देखील झाली. यामुळे पिंपळाच्या झाडावर अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या पोपटांना आपला जीव गमवावा लागला. यात तब्बल १०० पोपटांचा मृत्यू झाला, तर ३० पेक्षा जास्त पोपट जखमी झाले आहे. त्यामुळे नेहमी पोपटांचा पिंपळाच्या झाडावर असलेला किलबिलाट मात्र आता थांबला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Hormones वाढवण्यासाठी खा ही 4 फळे

Shilpa Shetty:शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल

Milk & Yogurt : दूध की दही; लहान मुलांसाठी जास्त फायदेशीर काय ?

Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

SCROLL FOR NEXT