Mumbai Agra Highway Accident Saamtv
महाराष्ट्र

Nashik Accident: नाशिकमध्ये खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, १४ प्रवासी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

Mumbai Agra Highway Accident: नाशिकच्या चांदवडजवळ मुंबई आग्रा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, नाशिक|ता. २१ जानेवारी २०२४

Nashik Accident News:

नाशिकमधून एक मोठ्या अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या चांदवडजवळ मुंबई आग्रा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Latest News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गांवर नाशिकच्या चांदवडजवळ खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. १८ प्रवाशांना घेऊन ही बस मध्यप्रदेशातून मुंबईकडे जात होती.

पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे समोरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हॉटेल माथेरान जवळ बस पलटी झाली. अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्यांवर सध्या चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपुरमध्ये भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू...

नागपुर शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहिला रस्ता अपघात कामगर नगर येथे झाला, त्यात एका विवाहितेचा मृत्यू झाला. दुसरा रस्ता अपघात (Nagpur Road Accident) विहीरगाव येथे झाला, त्यात दोघांचा मृत्यू झाला. तर तिसरा अपघात पारडी परिसरात झाला, त्यात एका मुलीचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT