Nashik News Today Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: पीठ मळणी यंत्रात अडकून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू; दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ

अभिजीत सोनावणे

Nashik News Today: नाशिकमध्ये पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बेकरी पदार्थ तयार करण्याच्या विद्युत पीठ मळणी करणाऱ्या यंत्रात अडकल्याने ३ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंचवटीच्या इंद्रकुंड परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा आणि पालकांनी घ्यावयाच्या काळजीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. रिहान शर्मा असं मृत बालकाच नाव असून रात्री खेळता खेळता तो घराशेजारील बेकरीमध्ये गेला. तिथं बेकरीतील विविध पदार्थ एकजीव करण्यासाठी वापरण्यात येणारे मळणी यंत्र बंद होते.

मात्र खेळताना रिहानचा तोल गेल्याने तो या यंत्रात पडला. त्याच्या धक्क्याने मळणी यंत्र सुरू झाल्यानं रिहान यंत्रात अडकून गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इंद्रकुंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Nashik News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथील एका बेकरीमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घटना घडली. रिहान शर्मा असे या चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता रिहान हा आपल्या घराजवळ खेळत होता. यावेळी बेकरीतील विविध पदार्थ एकजीव करण्यासाठी वापरण्यात येणारी गिरणी मशीन ठेवण्यात आलेली होती, मात्र काम बंद असल्याने ती मशीन बंद होती.

याचवेळी रिहान हा गिरणीच्या आजूबाजूला खेळत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो गिरणीत पडला. त्याच्या धक्क्याने गिरणी सुरु झाली त्यातल्या पात्यांसहित बेल्टमध्ये अडकून रिहान गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT