Lasalgaon Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Lasalgaon Bajar Samiti : लासलगाव बाजार समितीत डाळींब, टोमॅटो, ड्रॅगन फ्रुट खरेदी; आजपासून लिलावास सुरवात

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून डाळींब, टोमॅटो व ड्रॅगन फ्रुटच्या लिलावास सुरवात करण्यात आली. यामुळे आता या बाजार समितीमध्ये डाळींब, टोमॅटो व ड्रॅगन फ्रुट देखील उपलब्ध होणार आहे. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव येथील बाजार समिती हि कांदा लिलावासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. मात्र कांद्यासोबत आता डाळींब, टोमॅटो व ड्रॅगन फ्रुट खरेदी करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. याचा शुभारंभ आजपासुन करण्यात आली आहे. यामुळे लासलगाव (Bajar samiti) बाजार समितीत सुरु झालेल्या डाळींब, टोमॅटो लिलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. शिवाय किरकोळ व्यापारी देखील येथून हा माल खरेदी करू शकतील. 

ड्रॅगन फ्रुटलाही मिळाला चांगला भाव   

बाजार समितीमध्ये आज सकाळी लिलाव झाल्यानंतर डाळींबाच्या २० किलोच्या कॅरेटला जास्तीत जास्त ४ हजार १०० तर कमीत कमी ७५० रुपये दर मिळाला. तर टोमॅटोला जास्तीत जास्त १ हजार ५०० रुपये तर कमीत कमी ७५० रुपये भाव मिळाला. यंदा लासलगाव बाजार समितीत प्रथमच ड्रॅगन फ्रुटचा लिलाव देखील सुरु करण्यात आला असून दोन क्रेटमध्ये आलेल्या ड्रॅगन फ्रुटला प्रतिक्रेट १ हजार ६०० रुपये इतका बाजार भाव मिळाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Handle Saree in Dancing? : साडी नेसून मिरवणुकीत डान्स कसा करायचा? करिष्माने थेट नाचून दाखवलं, VIDEO

Sunflower Seeds Benefits: सूर्य फुलाच्या बिया खाण्याचे आश्चर्यकारक फायदे!

मोठी बातमी! आता पीएफ खात्यामधून १ लाख रुपये काढता येणार, EPFO चा नवीन नियम

Ajit Pawar : अजित पवारांचं टेन्शन वाढलं? जागावाटपाच्या बैठकीला अनेक आमदारांची दांडी!

Saamana Editorial: मोदींनी विष पेरले, ते उगवले; राहुल गांधींवरील हिंसक वक्तव्यांना छुपा पाठिंबा? 'सामना'तून टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT