Nashik Maharashtra Police Academy Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: पोलीस महिलेला बेदम मारहाण करून रात्रभर बलात्कार, व्हिडिओ काढले; महाराष्ट्र पोलीस अकादमीत संतापजनक घटना

Nashik Maharashtra Police Academy: नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पोलीस अकादमीमध्ये स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यानेच महिला पोलीस कर्मचारीवर बलात्कार केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये महिला पोलीस कर्मचारीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. महिला पोलिस कर्मचारीला रात्रभर बेदम माराहण करून बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी महिला पोलिसांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचारीवर बलात्कार करण्यात आला आहे. पोलीस अकादमीमध्ये स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यानेच या महिला पोलिसावर बलात्कार केला. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. आरोपीने महिला पोलिसाला रात्रभर मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

महिला पोलीस कर्मचारी आणि आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सदर महिला पोलिसाने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला रात्रभर बेदम माराहण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिला पोलिसाचे व्हिडीओ देखील काढले आहेत. हा सर्वप्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीमध्येच घडला आहे. सध्या महिला पोलीस कर्मचारीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास

थकवा झटक्यात निघून जाईल! शरीराची एनर्जी वाढवण्यासाठी सकाळी प्या 'ही' नॅचरल टी

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री फोन; नंतर फडणवीसांनी बीएमसीमधील शिंदे गटाच्या प्लॅनला लावला ब्रेक

PMC Recruitment : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! नियुक्तीपत्रांवर असणार QR कोड, बनावट भरतीला बसणार आळा

Pune : पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल, कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT