Nashik Accident  Saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident News: खड्डा चुकवायला गेला, अन् दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडलं, भयानक घटना CCTV मध्ये कैद

Nashik Bike And Truck Accident: हा भीषण अपघात रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत (CCTV Camera) कैद झाला आहे.

Priya More

तरबेज शेख, नाशिक

Nashik News: नाशिकमध्ये (Nashik) खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खड्डा चुकवायला गेला अन् पाठीमागून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने दुचाकीस्वाराला (Truck And Bike Accident) चिरडले. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत (CCTV Camera) कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर परिसरातील संजीवनगर येथे ही अपघाताची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन जाणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर असलेले खड्डे चुकवताना दुचाकीस्वाराला ट्रकने उडवले. त्यानंतर हा दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. राजकुमार सिंह असं अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. राजकुमार दुचाकीवरून कंपनीत कामावर जात होता. तो संजीवनगर येथील ज्या रस्त्यावरुन जात होतो त्या रस्त्यावर खड्डे पडले होते. त्यामुळे राजकुमार रस्त्यावर असलेले खड्डे चुकवायला गेला. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रकच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात नाशिक महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी केला आहे. या परिसरातील खड्डे बुजवले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे. या अपघाताचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Jam Recipe: खव्याचा गुलाबजाम बनवण्याची सोपी पद्धत, तोंडात टाकताच विरघळेल

Budget Friendly Plan: सणासुदीचा भन्नाट प्लॅन, फक्त १ रुपयात मिळवा दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग

Phaltan Doctor death : 'भाजपाच्या महान महिला गप्प का?' फलटण महिला डॉक्टर प्रकरणी ठाकरेंच्या शिलेदाराचा सवाल

काँग्रेसकडून अजित पवार गटाला जबरदस्त धक्का! बड्या नेत्यासह २३ जण हाती घड्याळ बांधणार

Maharashtra Live News Update: पीएसआय गोपाळ बदनेच शेवटचं लोकेशन सापडलं

SCROLL FOR NEXT