Nashik Currency Press Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : आता नाशिकमध्ये होणार नेपाळच्या नोटांची छपाई; कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद

नेपाळच्या चलनी नोटा छापण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या (Nashik) करन्सी नोट प्रेसमध्ये आता भारतीय चलनासोबतच नेपाळच्या १ हजार रुपयांच्या चलनी नोटांची देखील छपाई होणार आहे. नेपाळच्या चलनी नोटा छापण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Nashik News Today)

विशेष बाब म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये चीन, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, पाकिस्तान या देशांच्या नोटांची छपाई झाली आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात ही छपाई बंद झाली होती. आजही जवळपास 50 ते 60 देश आपले चलन बाहेरच्या देशातून छापून घेतात.

त्यामुळे आता नाशिकच्या नोट प्रेसमध्ये एक्सपोर्ट डिपार्टमेंट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून इतर देशांचे देखील करन्सी छापण्याचे काम कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं नोट प्रेस मजूर संघाचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT