Nashik Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Nashik Water Shortage : नाशिकवर ऐन पावसाळ्यात पाणीसंकट; अनिश्चित काळासाठी पाणीपुरवठा राहणार बंद

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नाशिक शहरामधून मोठी बातमी समोर येत असून शहरातील पाणी पुरवठा पुढील काही दिवस बंद राहणार आहे. नाशिक शहरातील पाणी पुरवठा पुढील दिवसात अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे नाशिकरांवर आता पाण्याचे संकट उभे राहिले आहे.

नाशिक (Nashik) महानगरपालिकेची गंगापूर धरण थेट पाणी पुरवठा योजनेतील रॅा वॅाटर रायझींग मेन ही पाईपलाईन सातपूर येथे लिकेज झाली आहे. नाशिक महानगरपालिकेने तातडीने पंपिंग बंद करून लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पाणी पुरवठा (Water Supply) विस्कळीत होणार आहे. हा लिकेज काढण्याचे काम किती दिवस चालेल याबाबत अनिश्चितता आहे. परिणामी नाशिक शहरातील पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. 

पावसाळ्यात पाणी संकट 

पाईप लाईन लिकेज काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याने या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे अवाहन नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र नाशिकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. टँकर किंवा विकतचे पाणी घ्यावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बालेवाडी परिसरात भाजप नगरसेवकडून शक्ती प्रदर्शन करत सरंजाम वाटप

Sanjay Raut: 'कितीही फिरले, थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार..', संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

VIDEO : जुन्नरचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला; बघा काय केली मागणी

Bigg Boss 18 : सदावर्ते सलमानसोबत तू तू मैं मैं करणार, चक्क गाढवासोबत बिग बॉसच्या घरात दाखल

Beed News : धक्कादायक.. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ट्रॅव्हल्स चालकाचा गळफास; मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT