nashik news saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : "सरकार दंगल घडवतंय" २९ ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईत धडक; दोन वर्षांच्या लढ्याचा निर्णायक टप्पा

Nashik News : मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत असून मनोज जरांगे यांनी “मुंबईकर आम्हाला लेकरं समजा, आम्ही शांततेत येतोय पण सरकार दंगल भडकवत आहे” असे म्हटले आहे.

Alisha Khedekar

  • २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलन मुंबईत धडकणार.

  • आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण; मोठ्या संख्येने मराठा समाज मार्गस्थ.

  • मनोज जरांगे यांचा दावा – “आम्ही शांततेत आरक्षण घेणार, सरकारला दंगल घडवायची आहे.”

  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेला मोठं आव्हान.

मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलकांचा मोर्चा थेट मुंबईत धडकणार आहे. या आंदोलनाला २९ ऑगस्टला दोन वर्षे पूर्ण होणार असून दोन वर्षांपासून चाललेल्या या लढ्याचा शेवट होण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी आंदोलक पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी “मुंबईकर आम्हाला लेकरं समजा. आम्ही गरीब आहोत, आमची लेकरं तुमच्या दारात न्यायासाठी येत आहेत. त्यामुळे आमच्यावर शंकेचं वातावरण तयार नका करू. सरकारला दंगल घडवायची आहे” असा सूर लावला.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे म्हणाले, " उत्सवाचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही. जसा गणेश उत्सव आमच्या लेकरा बाळांच्या सुखासाठी आहे तसेच आरक्षण सुद्धा मराठ्यांच्या लेकरांच्या सुखासाठी आहे. आम्ही मराठे हिंदुचे सगळे संस्कार आणि वारकरी संप्रदाय पाळतो. सरकारची लोक काही बातम्या पसरवतात त्यात आमची चूक काय? " असे वक्तव्य त्यांनी केले.

पुढे ते म्हणाले "आम्ही न्यायासाठी येत आहे उलट तुम्ही आम्हाला पाणी दिले पाहिजे. या आंदोलनासाठी चार महिन्यांपूर्वी आम्ही तारीख काढलेली आहे तेव्हा गणेश उत्सव आहे असं आम्हाला माहित नव्हतं. मुंबईकरांनी आम्हाला समजून घ्यावं. कोणाचाही बाप आडवा येऊ द्या आम्ही शांततेत मुंबईत येणार आणि शांततेत आरक्षण घेणार आहोत. 100% सरकारला दंगल घडवायची आहे, त्यांना मराठ्यांच्या अंगावर जाळ फेकायच आहे." असं मनोज जरांगे यांनी म्हटले

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पोलिस प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांना विशेष यंत्रणा तयार ठेवण्याचं आदेश देण्यात आलं आहे. कारण, लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास वाहतूक, कायदासुव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी प्रचंड वाढलेली असते आणि या वातावरणात आंदोलन झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गावोगावी जय्यत तयारी केली जात आहे. या आंदोलनाला मुंबईकरांचा प्रतिसाद कसा असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच सरकार या आंदोलनाबाबत कोणते निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Divorce: सायलेंट डिव्होर्स म्हणजे काय? घटस्फोटाआधीच तुटतं नातं; सायलेंट डिव्होर्सचे संकेत कोणते?

Maharashtra Politics: प्रभागरचनेत कुणाचा फायदा, कुणाचा तोटा?, भाजप-शिंदेंकडून दादांची कोंडी?

गर्लफ्रेंडला हॉटेलला बोलावलं, शरीरसंबंधांनंतर विवाहित पुरुषाचा मृत्यू; रुममध्ये विपरित घडलं

Dwarka Utsav : बैलांना रथात ठेवून शेतकऱ्यानं स्वतःला रथाला जुंपलं; काय आहे अकोल्यातील ३०० वर्षांची परंपरा ? जाणून घ्या सविस्तर

राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबेच्या दुकानाची मनसैनिकांकडून तोडफोड|VIDEO

SCROLL FOR NEXT