Igatpuri Rainfall  Saam Tv
महाराष्ट्र

Igatpuri Rain: नाशिकच्या इगतपुरीमध्ये धुवाधार पाऊस, दरेवाडीतील गावकऱ्यांच्या घरात शिरलं पाणी; पाहा VIDEO

Igatpuri Rain And Flood: इगतपुरीच्या भाम धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाल्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी दरेवाडीच्या नागरिकांच्या घरात शिरले आहे.

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिक जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या ४८ तासांपासून नाशिक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. इगतपुरी तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरेवाडीतील गावकऱ्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. या गावामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीच्या भाम धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाल्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी दरेवाडीच्या नागरिकांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. दिवसभर या गावातील नागरिकांनी पाण्यातच काढले त्यानंतर रात्री उशिरा प्रशासनाला जाग आली. रात्री उशिरा या गावातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या नागरिकांना आश्रमशाळेत स्थलांतरित करण्यात आले. प्रशासनाच्या कारभारावर या गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकच्या रामकुंड, गोदा घाटावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना पाण्याने वेढा घातला असून मंदिरांमध्ये पाणी शिरलं. प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकाने हलवण्यास सुरुवात केली आहे. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अशामध्ये नाशिकमधील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नार, पार, तान, मान आणि अंबिका नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT