Nashik Rain Update Saam tv
महाराष्ट्र

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार; जिल्ह्यातील १४ धरण ओव्हर फ्लो

Nashik Rain News : हवामान विभागाकडून नाशिकला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असला तरी अद्याप पावसाला सुरुवात नाही. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यास धरणातून केव्हाही पाणी सोडलं जाणार आहे

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : राज्यात सर्वदूर पाऊस सक्रिय झाला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले असून धरणातील पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच जिल्ह्यातील १४ धरण ओव्हरफ्लो झाली आहेत. तर लहान मोठ्या २४ धरणातील पाणीसाठा देखील ८५ टक्क्यांवर पोहचला आहे. 

राज्यात चार- पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून अनेक भागात रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्याला देखील आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे जलसंपदा विभागाकडून देखील अनेक गावांना अलर्ट देण्यात आलेला आहे. तर गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. 

पाणीसाठा पोहचला ८५ टक्क्यांवर 

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहचला आहे. तर नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८४.२५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास कधीही धरणातून पाणी सोडण्याचा इशारा दिला आहे. तर जिल्ह्यातील अन्य ११ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

तर धरणातून पाण्याचा विसर्ग 

नाशिकला आज देखील पावसाचा रेड अलर्ट असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवणार आहे. जिल्ह्यातील गंगापूर धरणात ८४.२५ टक्के पाणीसाठा, दारणा - ८७.३७ टक्के, मुकणे - ९५.१८ टक्के, नांदुरमध्यमेश्वर - ९६.५० टक्के, गिरणा - ६९.९४ टक्के, चणकापूर - ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आल्या १ लाख राख्या

Rain Alert : राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ; मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Nepal Floods: नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरानंतर भूकंपाचे धक्के, मृतांचा आकडा ४०० वर; २९० भारतीय बेपत्ता

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

SCROLL FOR NEXT