Nashik News  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

Nashik Police: नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. या व्यक्तीने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं. चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली

  • नाशिकच्या चांदवड तालुक्यात ही घटना घडली

  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली

  • घराजवळच्या विहिरीत तिघांनी उडी घेतली

अजय सोनवणे, नाशिक

नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात ही घटना घडली. दिघवद येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी दिग्वद परिसरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आज टोकाचे पाऊल उचलले. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह आत्महत्या केली. सचिन हिरे असं या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव होते. त्यांनी प्रज्ञा सचिन हिरे (१० वर्षे) आणि प्रज्वल सचिन हिरे (४ वर्षे) या दोन मुलांसह विहीरीत उडी घेत आत्मह्या केली. घराजवळील विहिरीत त्यांनी आयु्ष्याचा शेवट केला.

तिघांनी विहिरीत उडे घेत आत्महत्या केल्याची घटना कुटुंबाला समजताच खळबळ उडाली. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी चांदवडच्या रायपूर येथील स्कुबा ड्रायवरला बोलवण्यात आले होते. विहिरीत प्रचंड पाणी आणि गाळ होता. त्यामुळे बऱ्याच तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह विहिरीमधून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. सदर घटना ही कौटुंबीक वादातून झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चांदवड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT