Rahud Ghat Traffic Saam tv
महाराष्ट्र

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

Nashik News : गॅस गळतीमुळे टँकरवर पाण्याचा मारा करण्यात येत असून सकाळ पासून गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर या बुलेट गॅस टँकर मधल्या ऐका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात काल रात्री गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरू झाली होती. मनमाड, सिन्नर येथील पथकाने गॅस गळती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. यामुळे अजूनपर्यंत या घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी कायम आहे. परिणामी घाट रस्त्यावरून जाणारी वाहतूक मनमाड मार्गाने वळविण्यात आली आहे. 

मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात काल रात्री गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरू झाली होती. गॅस गळतीमुळे टँकरवर पाण्याचा मारा करण्यात येत असून सकाळ पासून गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर या बुलेट गॅस टँकर मधल्या ऐका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. गॅस गळतीमुळे आजू बाजूच्या गावांना तसेच रस्त्यावरील ढाबा चालकांना सातर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे.

वाहतूक कोंडीने अन्य मार्गावरून वाहतूक 

मुंबई- आग्रा महामार्गावरील राहुड घाटात गॅस टँकर (बुलेट टँकर)चा रात्री अपघात झाल्यानंतर गॅस गळतीमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. सकाळी अपघातग्रस्त ट्रॅकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरु होते. यामुळे मालेगाव कडे जाणारी वाहतूक मनमाड मार्गे मालेगावकडे वळवण्यात आली. तर चांदवड कडून येणारी वाहतूक आणि पुणे- इंदोर मार्गावरून रोजची होणारी वाहतूक यामुळे मनमाडच्या मालेगाव चौफुलीवर वाहनांची कोंडी होत आहे. 

विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचे हाल 

दरम्यान राहुड घाटातील वाहतूक बंद असल्याने चांदवड येथे कॉलेजला जाणाऱ्या तसेच मालेगाव येथून जाणारे शासकीय कर्मचारी यांचे मोठे हाल झाले आहे. दरम्यान गॅस गळती होत असलेल्या बुलेट टँकर मधून अन्य दुसऱ्या टँकर मध्ये गॅस भरला जात असला तरी या महामार्ग वरील वाहतूक कधी पर्यंत सुरळीत होईल याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. हा मार्ग सुरळीत चालू होण्यासाठी आणखी काही तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT