Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: चहासाठी गॅस पेटविताच भडका; जुने नाशिक परिसरात गॅसचा स्फोट

चहासाठी गॅस पेटविताच भडका; जुने नाशिक परिसरात गॅसचा स्फोट

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : जुना नाशिक परिसरामधील कुंभारवाडा भागामध्ये मोरे नामक व्यक्तीच्या घरामध्ये सकाळी गॅस सिलेंडरचा लीक झाला. त्यामुळे सुभाष मोरे व राधाबाई मोरे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. जीवित आणि झाले नसून घराचे नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)

जुने नाशिक परिसरातील सुभाष मोरे यांच्या घरी मोठ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर ते देवदर्शनासाठी गेले होते. गुरूवारी रात्री ते घरी आले. यानंतर आज सकाळी राधाबाई मोरे यांनी चहा ठेवण्यासाठी गॅस लावला. यावेळी रेगुलेटरमधून गॅस लिक व्हायला लागला होता. त्यांनी रेगुलेटर बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गॅसने अचानक पेट घेतला. त्यानंतर सुभाष मोरे व आजूबाजूला नागरिकांनी घराकडे धाव घेतली. नाशिक अग्निशामक दलाला कॉल केला.

नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी सिलेंडर घराच्या बाहेर काढून लीक झालेला सिलेंडर बाहेर काढला. तसेच त्यातील जखमी झालेल्या लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपूरची दीडशे वर्षांची ऐतिहासिक नगरपालिका होणार हेरिटेज वास्तू

Gauri Alankar: गौरीसाठी निवडा सुंदर अलंकार; गणेश चतुर्थीत सजावटीला मिळेल पारंपरिक आणि आकर्षक लूक

Railway News : रेल्वेचा प्रवास ठरणार त्रासदायक! रविवारी 'या' मार्गांवर ९ तासांचा मेगा ब्लॉक, लोकलसह अनेक गाड्या रद्द

Manoj Jarange : 'जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...'; दिपकेंच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पेपर फुटीत शिक्षण मंत्र्यांचा दोष नाही, योगेश कदमांच्या वक्तव्याने खळबळ; राजीनाम्यावर दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT