Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : घोलप कुटुंबातला वाद चव्हाट्यावर; माजी मंत्री बबनराव घोलपांनी मुलीलाच काढली नोटीस

Nashik News : विधानसभा निवडणुकीत भाऊ- भाऊ, भाऊ- बहीण यांची एकमेकांसमोर लढत पाहण्यास मिळत असते.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: ऐन भाऊबीजेलाच नाशिकच्या घोलप कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. राजकारणातून माजी मंत्री बबन घोलप यांनी आपल्या धाकट्या लेकीलाच जाहीर नोटीस काढली आहे. या जाहीर नोटीसमुळे नाशिकच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाऊ- भाऊ, भाऊ- बहीण यांची एकमेकांसमोर लढत पाहण्यास मिळत असते. अर्थात राजकारणात हे चित्र अगदी सहज पाहण्यास मिळत असून नाशिकमध्ये वडिलांनी मुलीच्या नावे वकिलामार्फत जाहीर नोटीस काढली आहे. यात माजी मंत्री बबनराव घोलप यांची लहान मुलगी तनुजा घोलप यांना काढलेल्या नोटिसमध्ये आपला विवाह झाला असल्याने माहेरचे नाव न लावता सासरकडील नाव लावावे; असं त्यात नमूद करण्यात आले आहे. 

महत्वाची बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश घोलप यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यावेळी बबन घोलप यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा उपनेते पदाचा राजीनामा देत योगेश घोलप यांच्यासाठी प्रचारात सरसावले आहेत. याच दरम्यान तनुजा घोलप यांनी देवळालीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे घोलप कुटुंबातील राजकारण आणि जाहीर नोटीसीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ananya Panday: अनन्या पांडेचा रस्ट कलर साडी लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update: धुळे तालुका पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांना झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

SCROLL FOR NEXT