Ulhasnagar News : शिवसेना- भाजपमध्ये उफाळला वाद; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, महायुतीच्या मेळाव्यावर शिवसेनेने टाकला बहिष्कार

Ulhasnagar News : विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची महायुती असून तिन्ही पक्ष मिळून निवडणूक लढवत आहेत.
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात, असं खळबळजनक विधान भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद उफाळला असून आज महायुतीचा उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. 

विधानसभा निवडणुकीत (BJP) भाजप, शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची महायुती असून तिन्ही पक्ष मिळून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान मागच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेत फूट पडून शिंदे गट वेगळा होऊन राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. मात्र या शिंदे गटावर ठाकरे गटाकडून गद्दारांची (Shiv Sena) शिवसेना असा आरोप करण्यात आला होता. यावरच भाजपचे उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात; असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजप व शिवसेनेत वाद उफाळून येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Ulhasnagar News
Chhagan Bhujbal: ओबीसींना आरक्षणातून ढकलून देण्याचा प्रयत्न; भुजबळांनी व्यक्त केली नाराजी

मेळाव्यावर टाकला बहिष्कार 

दरम्यान (Ulhasnagar) उल्हासनगरमध्ये महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महायुतीच्या मेळाव्यापूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यावर शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. रामचंदानी दिसताच घोषणा देण्याचा प्रयत्न करत शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारला. तसेच भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यासमोरही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. तर या मेळाव्यास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित झाले. तेव्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण यांना या जिल्हाध्यक्षावर कारवाई करा; अशी मागणी करत मेळाव्यावर बहिष्कार टाकला. तसेच या मेळाव्यात उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्षरीत्या दिलगिरी व्यक्त केली. मात्र आता उल्हासनगर मतदारसंघातील भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारात शिवसेना कधी सहभागी होते? हा तिढा कधी संपतो त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com