Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : १६३ फ्लॅट धारकांची दोन कोटीची फसवणूक; मुंबईच्या चार बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Nashik News : फ्लॅट खरेदीवेळी ठरल्याप्रमाणे सोसायटी स्थापन केली नाही. याशिवाय प्रोजेक्टच्या पत्रकाकानुसार सोयी-सुविधा न पुरविता कॉर्पस फंडामधील सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम फायद्याकरता वापरण्यात आल्याचा आरोप

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: फ्लॅट विक्री करताना माहिती पत्रकात दाखविलेल्या सोयी- सुविधा प्रत्यक्षात पुरविण्यात आल्या नाहीत. तसेच कॉर्पस फंड घेऊनही सोसायटी स्थापन न केल्याने साधारण १६३ फ्लॅट धारकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मुंबईच्या चार बांधकाम व्यावसायिक विरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

भारतीय डाक सेवा विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत अभिजित वानखेडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विनोद मदनलाल तलवार, चंद्रा विनोद तलवार, सुनील देवीसहाय गुप्ता, कविता सुनील गुप्ता असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायकांचे नाव आहेत. हे सर्व मुंबईत राहणारे आहेत. यांच्या विरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. १३ मे २०१३ ते २० जून २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे वानखेडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

२ कोटी २६ लाख घेतले 

काठे गल्ली परिसरात असलेल्या कर्मा गॅलक्सी अपार्टमेंटचे चेअरमन म्हणून वानखेडे हे काम पाहतात. त्यांच्यासह एकूण १६३ फ्लॅटधारकांनी २०१३ ते २०२४ या कालावधीत मे. मेसर्स कर्मा रिऍलिटीतर्फे कर्मा गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये भागीदार असलेल्या संशयित चौघांकडून फ्लॅट खरेदी केले. त्यावेळी या १६३ जणांकडून संबंधित संशयितांनी कॉर्पस फंड म्हणून २ कोटी २६ लाख ४० हजार ४०० रुपये घेतले. 

सांगितल्याप्रमाणे सोयी सुविधाही नाही 

फ्लॅट खरेदीवेळी ठरल्याप्रमाणे सोसायटी स्थापन केली नाही. याशिवाय प्रोजेक्टच्या माहिती पत्रकात दर्शविण्यात आलेल्या काही सोयी-सुविधा न पुरविता कॉर्पस फंडामधील सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम स्वतःच्या फायद्याकरता वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वानखेडे व अन्य फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कमलांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT