Nashik Farmer Rasta Roko News Saamtv
महाराष्ट्र

Nashik Farmer News: निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक! नाशिकमध्ये स्वाभिमानी संघटनेचा रास्ता रोको; वाहतूक ठप्प

Nashik Farmer Rasta Roko: कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत

अजय दुधाणे

Nashik Onion Farmer News: कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच नाफेडने खरेदी केलेला कांदाही बाजारात आणला जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन छेडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र शासनाने देशात कांद्याचे दर वाढत असल्यामुळे निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर नाशिक (Nashik) आणि पुणे (Pune) जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे.

तसेच नाशिकच्या येवला येथे शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. मनमाड-येवला मार्गावर बाजार समिती समोर रास्ता रोको सुरू केला असून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या रास्ता रोकाने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती (Nashik Bajat Samitee) बंदला नगर जिल्ह्यातील किसान सभेने पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या सततच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी एकत्र येण्याच केलं आवाहन किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT