Nashik Politics news Saam tv news
महाराष्ट्र

Politics: ठाकरेंनंतर नाशिकमध्ये शिंदेंनाही मोठा झटका; माजी खासदार भाजपच्या वाटेवर

Nashik Politics news: नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजपात जाण्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. शिंदे गटाला धक्का, नगरसेवकही भाजपात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहत आहे. आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करीत आहेत. मात्र, नाशिकच्या राजकीय वर्तुळातून भूवया उंचावणारी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही माजी नगरसेवकासह ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतच भूकंप होणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मागील दोन - तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. हेमंत गोडसे यांच्यासोबत ५ ते ६ नगरसेवक देखील भाजपासोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो.

या चर्चांवर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा २ ते ३ दिवसांपासून सुरू असल्या तरी पण मी पक्षातच आहे', असं गोडसे म्हणाले.

शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हे सलग दोन वेळा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भूजबळ आणि २०१९ साली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता. नंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदेंची साथ दिली. २०२४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

महायुती आणि महाआघाडीमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू जरी असलं तरी, महायुतीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत शह- शहकाटशहचे वातावरण रंगल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेकडून भाजप पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. सध्या प्रत्येक पक्षाला प्रभागरचनेची प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT