Malegaon News Saam tv
महाराष्ट्र

ED Raid : मालेगावमध्ये ईडीची ९ ठिकाणी छापेमारी; बोगस जन्म दाखला प्रकरणी अटकेतील शेखच्या घराचीही झडती

Nashik Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. चौकशीअंती बोगस जन्म प्रमाणपत्राच्या आधारे ते राहत असल्याचे समोर आले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
मालेगाव (नाशिक)
: ईडीकडून मालेगावमध्ये मोठे सर्च ऑपरेशन राबविण्यात येत असून ईडीने शहरात एकाच वेळी ९ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहे. अवैध बांगलादेशी प्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. तर बोगस जन्म दाखला प्रकरणी अटकेत असलेल्या तव्वब शेख याच्या घराची देखील या छापेमारीत झाडाझडती करण्यात आली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. चौकशीअंती बोगस जन्म प्रमाणपत्राच्या आधारे ते राहत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान बांगलादेशी बोगस जन्म दाखला प्रकरणात महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंद विभागात कार्यरत तव्वाब शेख याला यापूर्वी अटक करण्यात आलेली होती. त्या अनुषन्गाने मालेगावमध्ये ईडीकडून पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. 

१६ तक्रारीच्या आधारावर कारवाई 

ईडीने मालेगावात एकाच वेळी ९ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तपासणी करण्यास सुरवात केली आहे. यात बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवण्याच्या प्रकरणात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तर महाराष्ट्र पोलिसानी दाखल केलेल्या १६ वेगवेगळ्या एफआयआरच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत सदरची कारवाई करण्यास सुरवात केली आहे. 

अटकेतील शेखच्या घराचीही झडती 

मालेगावमध्ये मोठे सर्च ऑपरेशन ईडीकडून करण्यात येत आहे. तर मालेगाव महानगरपालिका जन्म- मृत्यू विभागात कार्यरत तव्वाब शेख हे बोगस दाखला प्रकरणात अटकेत असून त्यांच्या घरावर देखील ईडीने छापेमारी करत तपासणी केली जात आहे. दरम्यान एकाच वेळी ईडीकडून ९ ठिकाणी होत असलेल्या छापेमारीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत २६४० घरांची निघाली लॉटरी, हक्काच्या घरासाठी कसा कराल अर्ज? किती असेल किंमत? वाचा A टू Z माहिती

खेळता खेळता 6 वर्षाच्या चिमुकल्याने लोहचुंबक गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाचवला जीव

Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update: खासदार पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला

MMC Elections: राजकीय हस्तक्षेपामुळे एमएमसी निवडणुकीत 'आयएमए'त फूट

SCROLL FOR NEXT