Nashik Kapaleshwar Temple Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : अगोदर घेतले दर्शन, संधी मिळताच दानपेटी घेऊन पसार; नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात भर दुपारची घटना

Nashik Kapaleshwar Temple : चोरट्यांकडून मंदिरात देखील चोरी करण्यास सुरवात केली आहे. कधी मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबविली जाते. तर कधी थेट दानपेटीत घेऊन जातात. तर मंदिरातील पितळी घंटा, देवावरची दागिने चोरून नेट असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: सध्या ठिकठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात चोरटयांनी आता मंदिर देखील टार्गेट केले आहे. मंदिरातील दानपेटी फोडून तेथील रक्कम लांबवत आहेत. त्याच नुसार नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरातून दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली आहे. घर दुपारच्यावेळी दानपेटी चोरून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

चोरट्यांकडून मंदिरात देखील चोरी करण्यास सुरवात केली आहे. कधी मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबविली जाते. तर कधी थेट दानपेटीत घेऊन जातात. तर मंदिरातील पितळी घंटा, देवावरची दागिने चोरून नेट असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. त्यानुसारच नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी भर दुपारी एका तरुणाने चोरून नेली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर मंदिर असून येथे वर्दळ असताना दानपेटी चोरीला गेली आहे. 

मंदिरात सुरु होती पैसे मोजणी 

भर दुपारी मारुती मंदिरातील दानपेटी चोरी झाली यावेळी जवळच असलेल्या कपालेश्वर मंदिरात पोलीस, सरकारी अधिकारी आणि मंदिर ट्रस्टी यांच्या उपस्थित दान पेटीमधले भाविकांनी टाकलेल्या रक्कमेची मोजणी सुरू होती. याच वेळी मंदिर परिसरातून छोटी दान पेटी चोरीला गेली आहे. मारुती दर्शनाला मंदिरात येणाऱ्या भाविकांना दानपेटी न दिसल्याने हा प्रकार समोर आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. 

अगोदर घेतले दर्शन

दरम्यान संपूर्ण घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे. या सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट व पांढरी टोपी घातलेल्या तरुणांने मंदिरातून दान पेटी चोरी केली आहे. अगोदर या तरुणाने मारुतीचे दर्शन घेतले. यानंतर थोडा वेळ उभा राहून संधी मिळताच दानपेटी उचलून फरार झाला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT