Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील दानपेट्या सिल; आयुक्तांनी का घेतला निर्णय?

Nashik News : नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्यात आले आहेत

अभिजित सोनावणे

नाशिक : अनेक मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांकडून देणगी स्वरूपात दान देण्यासाठी दानपेट्या ठेवण्यात आलेल्या असतात. त्यानुसार नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात ठेवलेल्या दानपेट्यांवरून दोन गटात वाद होते. शिवाय दानपेटी संदर्भात तक्रारी असल्यामुळे या दानपेट्या सील करण्यात आल्या आहेत. 

नाशिकच्या (Nashik) पंचवटी परिसरात असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्यात आले आहेत. कपालेश्वर महादेव मंदिर परिसरातील पाच दानपेट्या आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात असलेल्या दानपेटीवरून दोन गटात वाद निर्माण झाला होता. या वादानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. याबाबत काही तक्रारी देखील गेल्या होत्या. यामुळे आज धर्मदाय आयुक्तांनी मंदिरातील दान पेट्या सील करण्याचे आदेश काढत दानपेट्यांवर सरकारी कुलूप लावण्यात आले आहे. 

मंदिरातील दानपेट्यांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दानपेटीबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने धर्मादाय आयुक्तांनी या दानपेट्यांवर सरकारी कुलूप लावण्याचा आदेश दिला आहे.  हा निर्णय पुढील अंतिम आदेश होईपर्यंत लागू राहील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

PIB Fact Check: SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! Aadhaar अपडेट करा अन्यथा खातं होणार बंद; वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Tourism : जंगल ट्रेकिंगचा रोमांचक अनुभव घ्या, थंडीत 'या' ठिकाणाची सफर करा

Face Yoga Exercise: सकाळी उठल्यावर करा हे 5 फेस योगा प्रकार, काचेसारखा चमकत राहील चेहरा

Home Remedies For Acidity : तुम्हालाही सतत अॅसिडिटी होतेय? मग हे घरगुती उपाय करून पाहाच

SCROLL FOR NEXT