Navratri Utsav Saam tv
महाराष्ट्र

Navratri Utsav : भाविकांना २४ तास घेता येणार कालिका मातेचे दर्शन; नवरात्रोत्सवानिमित्त देवस्थानाचा निर्णय

Nashik News : नवरात्री उत्सवात कुलदेवता किंवा जवळच्या देवीच्या देवस्थानावर जाऊन दर्शन घेत असतात. उत्सवातील नऊही दिवस भाविकांची प्रचंड गर्दी होत असते

Rajesh Sonwane, अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचे मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. यामुळे नवरात्रौत्सवात २४ तास मातेचे दर्शन घेता येणार आहे. नवरात्र काळात भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांना २४ तास देवीचे दर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.

नवरात्रोत्सवाला ३ ओक्टोम्बरलापासून सुरवात आहे. या (Navratri Festival) नवरात्री उत्सवात कुलदेवता किंवा जवळच्या देवीच्या देवस्थानावर जाऊन दर्शन घेत असतात. उत्सवातील नऊही दिवस भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. यात (Nashik) नाशिकचे ग्रामदैवत समजल्या जाणाऱ्या कालिका मातेच्या दर्शनासाठी देखील भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. यामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता नवरात्रौत्सवात कालिका मातेचे मंदीर २४ तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे. अर्थात भाविकांना २४ तास घेता येणार आहे. 

१०० रुपयात सशुल्क दर्शन 

यासोबतच झटपट दर्शन घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थात १०० रुपयांत सशुल्क दर्शनाची देखील व्यवस्था असणार आहे. उद्या पहाटे घटस्थापना झाल्यानंतर देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. महिलांच्या सोयीसाठी यंदा महिलांच्या स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था देखील करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सीसीटिव्ही कॅमेरांची नजर असेल, त्यासोबतच महिला आणि पुरुष सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT