Nitin Gadkari  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : केंद्र सरकारचा महामार्ग भूमिपूजन कार्यक्रम फ्लॉप? नितीन गडकरींच्या सभेकडे नागरिकांनी फिरवली पाठ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीतील महामार्ग भूमिपूजन कार्यक्रम फ्लॉप ठरला आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीतील महामार्ग भूमिपूजन कार्यक्रम फ्लॉप ठरला अशी चर्चा सुरू झाली आहे. नाशिकच्या इगतपुरीमधील महामार्ग भूमिपूजन कार्यक्रमातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेकडेही नागरिकांनी पाठ फिरवली आहे. कार्यक्रम स्थळी असलेल्या खुर्च्या निम्म्याहून अधिक रिकाम्या दिसल्या. कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या इगतपुरीमध्ये आज, रविवारी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या 226 कि.मी. लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांचा लोकर्पण व कोनशिला आनावरण सोहळा पार पडत आहे. ईगतपुरीतील गार्डन व्ह्यू महिंद्रा प्रकल्पाजवळ हा सोहळा सुरु झाला आहे.

केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. कार्यक्रम स्थळी असलेल्या खुर्च्या निम्म्याहून अधिक रिकाम्या दिसत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य महामार्ग भूमिपूजन कार्यक्रमा फ्लॉप ठरला, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही शाळकरी मुलांना आणण्यात आल्याचे दिसून आले. राजकीय कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, नागरिकांच्या अनुपस्थितीमुळे हॉलमधील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या दिसल्या. कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, आज,रविवारी इगतपूरीतील घोटी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टोल नाक्यावरील गर्दीमुळे वाहन चालक त्रस्त झाले होते. या वाहनकोंडीचा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना देखील अनुभव आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT