अजय सोनवणे
नाशिक : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या.नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ६ एप्रिलपासून चैत्र नवरात्रोत्सव सुरु होत आहे. या उत्सवाच्या कालावधीत सप्तशृंगी देवीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना देवीचे २४ तास दर्शन घेता येणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शक्तिपीठ सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास ६ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. उत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी गडावर प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट, ग्रामपंचायत तसेच महसूल व पोलिस तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
६ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान हा उत्सव सुरू राहणार आहे. चैत्रोत्सव काळात हजारो भाविक सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चैत्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रात्री देखील भाविकांना देवीचे दर्शन घेता येणे शक्य होणार आहे.
जादा बसचे नियोजन
दरम्यान भाविकांना येण्याजाण्यासाठी नाशिक व अन्य विभागातून ३५० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. नांदुरी ते सप्तशृंगी गड १३० बसेसची व्यवस्था असेल. तर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी खासगी वाहनांना प्रवेश नसणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक, २० निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, २९५ कर्मचारी आणि २५० हेड कॉन्स्टेबल तैनात करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.