Nashik News : नाशिकमधून (Nashik) एक मोठी बातमी समोर येतेय. नाशिकमध्ये कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात 'कॅटस'मधले लष्काराचे दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात अडकलेत. कंत्राटदाराकडून लाच घेताना लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांना सीबीआयनं रंगेहात अटक केली आहे. (Nashik News Today)
सहाय्यक अभियंता मेजर हिमांशू मिश्रा आणि कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले अशी अटक करण्यात आलेल्या लष्करी अधिकाऱ्यांची नावं आहेत. बिलाचे पैसे काढून देण्यासाठी या दोनही लष्करी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून १ लाख २० हजारांची लाच मागितली होती. त्यांना सीबीआयने रंगेहाथ पकडलंय. (Latest Marathi News)
सीबीआयकडून गुरूवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे. हे दोनही लष्करी अधिकारी सध्या ताब्यात असून त्यांना उद्या म्हणजेच शुक्रवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआय त्यांच्या कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra News)
प्राप्त माहितीनुसार, या दोनही अधिकाऱ्यांच्या राहत्या घरी आणि त्यांच्या कार्यालयाची सुद्धा सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात येणार आहे. दरम्यान, सीबीआयने नाशिकमध्ये केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी नाशकात सीबीआयकडून जीएसटीच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.