Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारी गाडी जमावाने पेटवली

Nashik News : नाशिकच्या येवला तालूक्यात रात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांच्या जमावाने अवैध जनावरांची गाडी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. (Police) पोलिसांनी ही कारवाई दुपारी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास पुन्हा एक गाडी आढळून आल्याने अज्ञातांनी (Nashik) जनावरांची वाहतूक करणाऱ्या या गाडीलाच पेटवून दिले. (Live Marathi News)

नाशिकच्या येवला तालूक्यात रात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांच्या जमावाने अवैध जनावरांची गाडी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान २७ जानेवारीला दुपारच्या सुमारास गोवंशाची गाडी घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा कारवाई झाली असतांनाच रात्रीच्या सुमारास पुन्हा अवैधरित्या गाडीतून जनावरे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर न्याहारखेडे शिवारत वळण बंधाऱ्याजवळ काही तरुणांच्या जमावाने पाठलाग करत गाडीतील गोवंश खाली उतरवत गाडीला (Fire) आग लावली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गाडी संपूर्णपणे जळून खाक 

यात संपुर्ण गाडी जळून खाक झाली. याची माहिती येवला तालूका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यापुर्वीच संपुर्ण गाडी जळून खाक झाली होती. जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून गाडी पेटविणाऱ्या तरुणांचा पोलिस शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prolonged sitting: तासन्‌तास एकाच जागी बसून राहता? सावधान! कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचा संशोधनातून धक्कादायक खुलासा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k- 22k आणि 24kचे दर

Chanakya Niti: कमी वेळेत श्रीमंत कसं बनाल? आचार्य चाणक्यांनी सांगितलाय मार्ग

Bribe Case : कोकणात खळबळ! बड्या अधिकाऱ्याने NOC साठी मागितली खड्याची अंगठी; असा अडकला ACB च्या जाळ्यात

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी डोळे देतात 'हे' ५ संकेत, दुर्लक्ष करू नका नाहीतर...

SCROLL FOR NEXT