Nashik Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Nashik Bribe Case : मध्यवर्ती कारागृहातील वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत विभागाच्या ताब्यात; कैद्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच

Nashik News : महाराष्ट्रात पहिल्यांदाच कारागृहामध्ये झालेल्या या कारवाईमुळे अँटी करप्शन विभागाचे कौतुक होत आहे.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कारागृहातच वैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ४० हजार रुपयांची मागणी करून ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे नाशिकचे मध्यवर्ती कारागृहातील अर्थकारण पुन्हा एकदा समोर आला आहे.

नाशिकरोडच्या (Nashik) मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आबिद आबू अत्तार व वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार अशी लाच (Bribe) घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच कारागृहामध्ये झालेल्या या कारवाईमुळे अँटी करप्शन विभागाचे कौतुक होत आहे. दरम्यान तक्रारदाराचे मित्र मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून शासकिय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय ६५ वर्षा पेक्षा जास्त आहे. तसेच ज्या कैदीने १४ वर्षे शिक्षा भोगली आहे; अशा कैदांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते. परंतु त्यांना बाहेर सोडण्याकरीता मुख्य वैद्यकिय अधिकारी यांचे फिटफॉर सर्टिफिकेटची गरज असते. 

त्यानुसार अत्तार व खैरनार यांनी तक्रारदार यांचे मित्र यांना फिटफॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी केली. तडजोड अंती ३० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. मात्र तक्रारदाराने याबाबत (ACB) एलसीबीकडे तक्रार दिली होती. लाचेची रक्कम काल स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दोघांच्या घराची झाडाझडती घेतली असताना आरोपींकडून कुठल्याही प्रकारचं काही मिळाल नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

SCROLL FOR NEXT