Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: पोलिसांच्या हातातून फरार आरोपीचा सापडला मृतदेह; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Nashik News: पोलिसांच्या हातातून फरार आरोपीचा सापडला मृतदेह; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Rajesh Sonwane

तबरेज शेख
नाशिक
: दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार (Nashik) केल्याच्या आरोपात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित पोलिसांच्या (Police) हातावर तुरी देऊन फरार झाला होता. या संशयित आरोपीचा मृतदेह विहरित आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

नाशिकच्या दिंडोरी पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबरला पिंपळनारे गावातील ३५ वर्षीय उमेश खांदवे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याने एका वीस वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून ती मुलगी काही महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं होते. संशयिताला तपासकामी त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले असता तेथून परत येतांना नाशिकच्या गंगापूर रोडवर लघुशंकेच्या बहाण्याने उमेश खांदवे पोलीस वाहनातून खाली उतरला आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन त्याने पळ काढला होता.

पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन 

या प्रकरणातील पीडित मुलीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी संशयित उमेश खांदवे यास अटक केली होती. मात्र संशयिताने लघुशंका बहाणा करत पोलिसांच्या हाताला झटका देत पळ काढला होता. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Escalator In Marathi: एस्कलेटरला मराठीत काय म्हणतात?

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Shreeram Lagoo: अभिनयाची आवड, ४२ व्या वर्षी डॉक्टरकीला रामराम, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT