मुंबई : सोयाबीन पिकांवर विषाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळाला. यामुळे सोयाबीन उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या (Soybean) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विमा मिळण्यासाठी दिलासा मिळाला आहे. याकरिता तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Tajya Batmya)
कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा (Crop Insurance) म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करसाचे निर्देश देण्यात आले.
नऊ जिल्ह्यात मोठा प्रादुर्भाव
राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम,नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.