Nashik ZP Saam tv
महाराष्ट्र

Nashik ZP : जिल्हा परिषदेत प्लॅस्टिक बाटल्या वापरास बंदी 

Nashik News जिल्हा परिषदेत प्लॅस्टिक बाटल्यांना बंदी

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : पर्यावरणासह आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) मुख्यालयात प्लॅस्टिक बाटल्या वापरण्यास (Nashik) कर्मचाऱ्यांसह येणाऱ्या अभ्यागतांनाही बंदी घालण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नाशिक जिल्हा परिषद मुख्यालयात कोणीही पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करू नये, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी (Plastic Ban) प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करण्याचे प्रमाण वाढले असून प्लॅस्टिक बॉटलचा अतिरिक्त वापर केल्यास कॅन्सर, मधुमेह, हृदयरोगासह गर्भवती मातेस आणि बाळास धोका होतो. 

प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये विविध प्रकारचे आरोग्यास हानिकारक असलेल्या रसायनांचा वापर केलेला असतो. त्यामुळे या आजारांपासून दूर राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिक बॉटलपासून दूर राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

SCROLL FOR NEXT