Trimbakeshwar News Saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण; आखाडा परिषद शोधणार परंपरेचे सत्‍य

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणात आखाडा परिषदेची उडी; परंपरेचे शोधणार सत्‍य

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर मंदिरातील बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावरून वातावरण चांगलचं (Nashik News) तापलंय. या प्रकरणावरून एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. तर दुसरीकडे आखाडा परिषदेनेही आता या वादात उडी घेतली असून धूप दाखवण्याच्या परंपरेमागील सत्य आता आखाडा परिषद शोधणार आहे. या सर्व वादात (Trimbakeshwar) त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांनी मात्र या घटनेच्या राजकारण करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत गावातील एक एकोपा कायम राखण्याची स्तुत्य भूमिका घेतली. (Latest Marathi News)

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेश प्रकरण काही शांत होतांना दिसत नाही. या प्रकरणी एकीकडे हिंदू संघटनांनी घेतलेला आक्रमकपणा तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण जोरात सुरू आहे. असे असतांनाच आता त्र्यंबकेश्वरमधील आखाडा परिषदेनेही या वादात उडी घेतली. त्र्यंबकेश्वराला खरोखरच उरुसमधील धूप दाखवण्याची परंपरा आहे की नाही? मंदिरात बळजबरीने घुसण्याचा खरचं प्रयत्न झाला अथवा नाही? यागील सत्य आखाडा परिषद शोधणार आहे. त्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या ७ आखड्यांमधील साधू, महंतांची समिती गठित करण्यात आली असून ही समिती १ जूनला आपला निर्णय देणार आहे.

ग्रामस्‍थांची शांतता

एकीकडे मंदिर प्रवेशावरून मोठं वादळ निर्माण झाले असताना त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र शांतता आहे. त्र्यंबकवासियांनी शांतता आणि सलोख्याची स्तुत्य भूमिका घेतली. गावातील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिक आणि नेते मंडळींनी बैठक घेऊन या प्रकरणाचे राजकारण करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केलाय. या प्रकरणाचे कुणीही राजकारण करू नये, गावात शांतता राहू द्यावी, अशी विनंती गावकऱ्यांनी केली.

त्र्यंबकेश्वर प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी राज्यसरकारने देखील एसआयटी नेमलीय. या प्रकरणामागील सत्य आणि तथ्य चौकशीनंतर समोर येईल. मात्र यावरून जातीय तेढ निर्माण न करता जातीय सलोखा आणि एकोपा कायम राहील, यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' तारखेपर्यंत करा e-KYC, मंत्री आदिती तटकरेंनी दिली अखेरची मुदत

Maharashtra Live News Update: ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही - रामदास आठवले

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा, २४ तास पोलीस तैनात राहणार, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT