Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : ३१४ किलो भेसळयुक्त पनीर साठा नष्ट; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Nashik News : नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाला गुप्त माहितीच्या आधारे सिन्नर एमआयडीसी येथे एका दुध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या यशवी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस येथे भेसळयुक्त पनीर बनविण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

अभिजित सोनावणे

सिन्नर (नाशिक) : भेसळयुक्त पनीर बनवून त्याची विक्री केली जात होती. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती झाल्यानंतर पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. याठिकाणी असलेला सुमारे ३१४ किलो इतका भेसळयुक्त पनीर नष्ट करत तेथील साहित्य जप्त केले आहे.  

नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाला गुप्त माहितीच्या आधारे सिन्नर एमआयडीसी येथे एका दुध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या  यशवी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस येथे भेसळयुक्त पनीर बनविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ११ जुलैला सायंकाळी धाड टाकत पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले. त्याअनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची तपासणी केली असता त्याठिकाणी पनीर बनवितांना रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करतांना आढलून आले. 

त्यानुसार घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण ३१४ किलो साठा ज्याची किंमत ५३ हजार ३८० रुपये इतकी आहे. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा देखील जप्त केला. तर भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT