Nashik News
Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : मॅजिक बॉल गिळल्याने १८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; नाशकातील दुर्देवी घटना

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : अंबरनाथमध्ये घशात मासा अडकून अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच, नाशिकमधून अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये (Nashik) मॅजिक बॉल गिळल्याने एका १८ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिवांश संकेत बोराडे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. (Nashik News Today)

वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिवांश याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. इतकंच नाही, तर या महिलेने तिच्या पतीविरोधात पोलिसांत (Police) तक्रार देखील दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिच्या पतीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. कौटुंबीक मतभेदामुळे १८ महिन्यांचे बाळ घरात असल्याचे माहित असताना देखील पतीने त्याला खेळण्यासाठी मॅजिक बॉल आणला, असा आरोप शिवांश याच्या आईने केला आहे.  (Latest Marathi News)

तसेच आपल्या पतीला मेडिकल फिल्डची आणि छोटा मॅजिक क्रेझी बॉल गेल्याने बालकाचा मृत्यू होऊ शकतो याबाबत माहिती असताना देखील त्याने हे कृत्य केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १८ महिन्यांच्या बाळाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

उल्हासनगरात घशात मासा अडकून बालकाचा मृत्यू

उल्हासनगर : घशात मासा अडकून अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शहाबाज असं मृत्युमुखी पडलेल्या बाळाचं नाव असून खेळताना अचानक शहाबाजला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

South Africa Squad: T20 WC 2024 साठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा! IPL गाजवणाऱ्या या खेळाडूंना मिळालं स्थान

Nagpur Constituency : 2 लाख मतदार वंचित, अधिकाऱ्यांची बेफिकिरी; नागपूर भाजप शहराध्यक्षांच्या दाव्यानं अधिकारीच गोत्यात!

Today's Marathi News Live : निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम, गिरीश महाजनांसोबतची चर्चा निष्फळ

Hindu Religion: लग्नसंमारभात कोणत्या बोटाने टिळा लावावा?

Kalyan Lok Sabha : कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविरुद्ध अपक्ष लढाई; नेत्यानं श्रीकांत शिंदेंचं नावही घेतलं नाही!

SCROLL FOR NEXT