leopard attacked in Vanarewadi area Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : भयंकर! बिबट्याच्या हल्यात १६ वर्षीय युवकाचा मृत्यू; दिंडोरीमध्ये खळबळ

Rohini Gudaghe

अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या वनारेवाडी परिसरात रात्री युवकावर बिबट्याचा हल्ला झालाय. या हल्ल्यात विठ्ठल पोद्दार या १६ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे.बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याचा शोध सुरू आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू

नाशिकमध्ये बिबट्याचा पुन्हा मुक्त संचार असल्याचं काल २२ ऑगस्ट रोजी समोर (Nashik news) आलंय. नाशिक शहरातील रविशंकर मार्गावर असलेल्या कुर्डूकर नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलंय. अशोका रॉयल बिल्डिंगच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आलाय. बिबट्याचा मुक्त संचाराचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नागरिकांनी, रात्री शतपावली करताना, घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन संबंधित प्रशासनाने (youth death in leopard attack) केलीय. बिबट्याला वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून जेरबंद करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. बिबट्याचा मुक्त वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण (leopard attack) आहे. नाशिक शहरामध्ये मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असल्याचं पाहायला मिळतंय. आता दिंडोरीमध्ये १६ वर्षीय तरूण बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलाय.

नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम

मागील आठवड्यात शुक्रवारी सायंकाळी जय भवानी रोड येथील पाटोळे मळ्यात बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला होता. आर्टीलरी सेंटरच्या संरक्षण भिंतीवर बिबट्या बसलेला होता, असा व्हिडिओ देखील समोर (Latest leopard news) आलाय. मानवी वस्तीमध्ये बिबट्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. जय भवानी रोड परिसरामध्ये याआधी देखील सात ते आठ बिबटे जेरबंद केलेले आहेत. नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम असल्याचं दिसत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचं वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech: समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध रहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात!

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

SCROLL FOR NEXT