Graduate Constituency Election Saam TV
महाराष्ट्र

Graduate Constituency Election: अखेर ठरलं! मविआचा पाठिंबा कोणाला? आज होणार जाहीर

MVA News: महाविकास आघाडीचा पाठिंबा नेमका कोणाला असणार हे जाहीर करण्यात येणार आहे.

Ruchika Jadhav

Padvidhar Election : पदवीधर निवडणुकीवरून सुरू असलेला उमेदवारांचा गोंधळ आज थांबणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसाठी नाशिक आणि नागपूरमध्ये नेमकं कोण उमेदवार असणार या बाबात प्रश्न निर्माण झाला होता. अशात आता आज दुपारी १२ वाजता या बाबत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये नाशिक आणि नागपूरसाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा नेमका कोणाला असणार हे जाहीर करण्यात येणार आहे. (Latest Graduate Constituency Election News)

महाविकास आघाडीमधून नाशिकसाठी शुभांगी पाटील यांनाच पाठींबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीत एकूण १६ उमेदवार आहेत. यात सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील आमनेसाने येत आहेत. आज महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यावर दोन ते तीन दिवसांत भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर करू शकते. त्यामुळे या निवडणुकीला आता आणखीन कोणते नाट्यमय वळण लागेल हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे. तसेच विजय नेमका कोणाचा होणार या बाबात देखील चर्चा सुरू आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण २२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सुरूवातीला २७ उमेदवारांनी अर्ज भरला होता. नंतर यातील ५ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर आता नागपूरमध्ये सुधाकर अडबाले हे काँग्रेस उमेदवार असणार आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेची याबाबत काल बैठक झाली. व्हिडिओ कॉल मार्फत बैठक घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत नागपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांना महावीकास आघाडीचा पाठिंबा असणार आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत नागपूरमध्ये सुधाकर अडबाले आणि नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांचे नाव जाहीर केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आमच्या नादाला लागायचं नाही - अविनाश जाधवांचा इशारा

Marathi Morcha : आम्हाला उचलून उचलून नेलं, आम्ही काय दहशतवादी आहे का? अविनाश जाधव संतापले

'..यांना एकत्र येऊ देऊ नका' मीरा भाईंदरमध्ये मराठी आंदोलकांची धरपकड; गुजराती-मारवाडी चिडवत होते | Marathi Morcha

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! कॉम्प्युटर क्लास मालकाकडून शिक्षिकेचा विनयभंग

Mira Bhayander Marathi Morcha: मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चात गोंधळ; प्रताप सरनाईकांना घोषणाबाजीने घेरलं, पाण्याची बाटलीही फेकली|VIDEO

SCROLL FOR NEXT