Accident Manmad latest News  
महाराष्ट्र

Accident News : देवदर्शनावरून येताना काळाचा घाला, बाप-लेकाचा जागीच मृत्यू, मनमाडवर शोककळा

road accident in Manmad, Nashik : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये पहाटे घडलेल्या भीषण अपघातात देवदर्शनावरून परतणाऱ्या बाप-लेकाचा मृत्यू झाला. पुतण्या गंभीर जखमी. पिकअप चालक फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे.

Namdeo Kumbhar

अजय सोनवणे मनमाड

Accident Manmad latest News : देव दर्शन करून घरी परत येताना बाप-लेकावर काळाने घाला घातला. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. या अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला. या घटनेने मनमाड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक येवला तालुक्यातील नगरसुल येथील वडाचा मळा परिसरातील किशोर ओंकार सोनवणे (वय ४०), त्यांचा मुलगा ऋतिक किशोर सोनवणे (वय ११) आणि पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे (वय २७) हे तिघे मोटारसायकलवर (एमएच १५ डीएफ ५२११) देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मागून येणाऱ्या पिकअप गाडीने (एमएच १५ जीके ४३१२) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, किशोर आणि ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र गंभीर जखमी झाला. जखमी रवींद्रवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर पिकअप चालकाने मोटारसायकलला जवळपास चार किलोमीटरपर्यंत ओढत नेले. मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून पिकअप ताब्यात घेतली, मात्र चालक फरार झाला.

अपघाताचा गुन्हा मनमाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी पिकअप जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी तपासाला गती द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT