Manmad News Manmad News
महाराष्ट्र

Manmad News : मेहुणे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार, नेत्यांना केली गावबंदी; दुष्काळी अनुदानासाठी ग्रामस्थांचा निर्धार

Nashik News : यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने राज्य शासनाने शेतकऱ्यांना दुधाळी अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र हे अनुदान लवकर मिळाले नाही.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : दुष्काळी अनुदान न मिळाल्याने नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील मेहुणे गावातील (Manmad) ग्रामस्थांनी आगामी लोकसभेसह येणाऱ्या सर्वच निवडणुकीवर (election) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसा फलकच ग्रामस्थांनी गावच्या प्रवेशद्रवारावर लावला आहे. (Tajya Batmya)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LOk Sabha Election) तयारीत सर्वच राजकीय पक्ष कमला लागले आहेत. आचारसंहिता लागल्याने शेतकऱ्यांना (Farmer) मिळणारे अनुदान आता रखडले आहे. यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने राज्य शासनाने शेतकऱ्यांना दुधाळी अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र हे अनुदान लवकर मिळाले नाही. यात आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने अनुदान देण्यास विलंब होत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळेच ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढाऱ्यांनाही केली गावबंदी 

विशेष म्हणजे लोकप्रतिनीधी व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत थकीत दुष्काळी अनुदान मिळत नाही' तोपर्यंत बंदी कायम ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबतचे फलक गावाबाहेर लावले आहे. यामुळे आता ग्रामस्थांना थकीत अनुदान मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT